नवी दिल्ली : माजी पंतप्रधानांचे नातू आणि माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा ४७ वर्षीय महिलेवरील बलात्कार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.
निकाल जाहीर होताच प्रज्वल रेवण्णा न्यायालयात भावनिक झाले आणि रडू लागले. न्यायालयातून बाहेर पडतानाही ते सतत रडत होते. एफआयआर दाखल झाल्यानंतर अवघ्या १४ महिन्यांत या प्रकरणाचा निर्णय देण्यात आला आहे.
या प्रकरणात पीडितेने ‘सीडी’ महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात सादर केली. आरोपानुसार, माजी खासदारानं घरकाम करणाऱ्या महिलेवर दोनदा बलात्कार केला होता. पीडितेने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि तीच सीडी पुरावा म्हणून ठेवली होती. फॉरेन्सिक तपासात सीडीवर शुक्राणूंचे ठसे आढळल्याने खटला मजबूत झाला.

Belgaum Varta Belgaum Varta