Thursday , March 5 2026
Breaking News

निवडणूक आयोगाविरोधात शिवसेनेची दिल्ली हायकोर्टात धाव

Spread the love

 

मुंबई : शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. पण अखेरीस आता दिल्ली हायकोर्टामध्ये सिवसेनेनं याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज किंवा उद्या सुनावणी होणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी दिली.
निवडणूक आयोगानं अंतिरम आदेश पारित केला आहे. आम्ही त्यादृष्टीने चिन्ह दिले आहे. आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नैसर्गिक न्यायात बाधा येणार असल्याचं आम्हाला दिसतंय. केंद्रीय निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. शनिवारी पत्र पाठवले आणि लगेच निर्णय घेतला, असा आरोप अनिल देसाई यांनी केला.
आयोगानं सुनावणी घ्यायला पाहिजे होती, आम्हाला अवधी द्यायला पाहिजे होता. एकतर्फी निर्णय आयोगानं घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं घाईनं निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या होत्या. दिल्ली हायकोर्टासमोर अनेक मुद्दे मांडले आहेत, अशी माहितीही देसाई यांनी दिली. पक्षाची घटना, पदाधिकारी सर्व गोष्टी आम्ही नमूद केल्या आहेत. यावर कोर्टात सखोल विचार होईल. फ्री चिन्हात राष्ट्रयत्व संदर्भात आक्षेप नसेल तर चिन्ह दिलं जाऊ शकत त्यामुळे आम्ही त्रिशूळला प्राधान्य दिले आहे, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *