सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये झालेल्या दोन कार बॉम्बस्फोटात किमान 100 जण ठार झाले आहेत. सोमालियातील शिक्षण मंत्रालयाबाहेर ही घटना घडली. सोमालियाचे अध्यक्ष हसन शेख यांनी एका निवेदनात या वृत्ताला दुजोरा दिला असून या घटनेत आतापर्यंत 300 लोक जखमी झाले आहेत.
सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये शनिवारी, 29 ऑक्टोबर रोजी दोन कार बॉम्बस्फोट झाले. ज्यात 30 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तर आता मृतांची संख्या 100 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं स्वीकारलेली नाही.
सोमालियाच्या राष्ट्रीय वृत्तसंस्थेनुसार, पोलीस प्रवक्ते सादिक दोडिशे यांनी सांगितलं की, दोन कार बॉम्बस्फोट झाले. असोसिएटेड प्रेसच्या पत्रकारांना घटनास्थळावरून अनेक मृतदेह सापडले. अमेन रुग्णवाहिका सेवेच्या संचालकांनी एपी वृत्तसंस्थेला सांगितलं की, त्यांनी अनेक जखमी किंवा ठार झालेले लोक गोळा केले आहेत. अब्दुल कादिर अदेन यांनी ट्वीटमध्ये सांगितलं की, दुसर्या स्फोटात एक रुग्णवाहिका उद्ध्वस्त झाली.
Belgaum Varta Belgaum Varta