Thursday , March 5 2026
Breaking News

केरळमधील हिंदू मंदिरात प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीला प्रवेश नाकारला

Spread the love

 

केरळ : दाक्षिणात्य अभिनेत्री आपल्या अभिनयाने लूकमुळे चर्चेत असतात. सध्या बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा दाक्षिणात्य अभिनेत्रींचा बोलबाला आहे. अशीच एक अभिनेत्री अमला पॉल, जिने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतीच तिने केरळमधील एका हिंदू मंदिराला भेट देणार होती मात्र तिला मंदिरात प्रवेश नाकारला. मंदिरातील अधिकाऱ्यांनी तिला रोखले, असा आरोप अभिनेत्रीने केला आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार केरळमधील एर्नाकुलम येथील तिरुवैरानिकुलम महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी सोमवारी गेली होती. ‘धार्मिक भेदभावामुळे तिला मंदिरात प्रवेश दिला नाही. या मंदिराच्या आवारात फक्त हिंदूंना परवानगी आहे. इतरांना दर्शन घेण्याची परवानगी नाही. नंतर अभिनेत्रीने दावा केला की तिला दर्शन नाकारण्यात आले आणि तिला मंदिरासमोरील रस्त्यावरून देवीचे दर्शन घेण्यास भाग पाडले.

अमलाने मंदिरातील एका रजिस्टरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने लिहले आहे की ‘हे दुःखद आणि निराशाजनक आहे की २०२३ मध्ये धार्मिक भेदभाव अजूनही अस्तित्वात आहे. मी देवीच्या जवळ जाऊ शकत नव्हते, पण दुरून दर्शन घेऊनही तिची अनुभूती येत होती. मला आशा आहे की धार्मिक भेदभावात लवकरच बदल होईल. अशी वेळ येईल जेव्हा धर्माच्या आधारावर नव्हे तर आपल्या सर्वांना समान वागणूक दिली जाईल. अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या घटनेनंतर ज्या ट्रस्टद्वारे मंदिराचा कारभार चालवला जातो त्या ट्रस्टच्या विरोधात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. ट्रस्टचे सचिव प्रसून कुमार म्हणाले, “अनेक धर्मातील भाविक मंदिरात दर्शनासाठी आले आहेत, परंतु हे कोणालाही माहिती नाही. मात्र, एखादी सेलिब्रिटी आली की ती वादग्रस्त ठरते. अमाला पॉलचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला आहे. अमला पॉल ही दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तमिळमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *