Friday , March 6 2026
Breaking News

नितीन गडकरी यांना पुन्हा हिंडलगा कारागृहातून धमकी

Spread the love

 

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या तीन फोन कॉल्सनंतर पोलिसांनी नितीन गडकरींचं जनसंपर्क कार्यालय आणि निवासस्थान या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. हा फोन नेमका कुणी केला याचा तपास आता पोलीस करत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे तीन फोन आल्याची बातमी एबीपी माझाने दिली होती.
जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने नितीन गडकरींना धमकी देण्यात आली आहे.दरम्यान नितीन गडकरी यांना बेळगावच्या हिंडलगा कारागृहातून धमकीचा फोन आल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्याचबरोबर मंगळूर येथील एका तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपासासाठी नागपूर पोलीस बेळगाव कडे रवाना झाले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *