Friday , March 6 2026
Breaking News

अजित पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा ठराव मंजूर, निवडणूक आयोगात पत्र दाखल

Spread the love

नवी दिल्ली : अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत अशा आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला असून तसं पत्र निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलं आहे. तशा आशयाचा ठराव पक्षाच्या आमदारांनी एकमताने मंजूर केल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता संपूर्ण राष्ट्रवादीवर दावा करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 30 जून रोजीचे राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या सह्यांचे पत्रदेखील अजित पवार यांनी 5 जुलैला म्हणजे आज दाखल केल्याची माहिती आहे. त्यामध्ये पक्षावर दावा करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या चिन्हाची लढाई आता निवडणूक आयोगात
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला आहे. आपल्याला पक्षातील बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला.

आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये, शरद पवारांची विनंती
आमची बाजू ऐकल्याशिवाय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी शरद पवारांनी कॅव्हेटद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सर्व प्रकरणाकडे पाहता ही शिवसेना फुटीनंतरच्या प्रकरणाची पुनरावृत्ती असल्याचं सातत्याने जाणवतं.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *