नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी (दि. 18) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. ठाकरे गटाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा, याबाबत दाखल केलेल्या याचिकेवरही सुनावणी होणार आहे.
सत्तासंघर्षाच्या निकालात आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारी याचिकाही ठाकरे गटाच्या वतीने दाखल केली होती. त्या याचिकेवरही सोमवारीच सुनावणी होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta