Monday , December 8 2025
Breaking News

“तरुणांच्या हाती काम नाही त्यामुळे त्यांचे दिवसातले सात ते आठ तास फेसबुक-इंस्टाग्रामवर…”, राहुल गांधींची टीका

Spread the love

 

नवी दिल्ली : भारतातल्या युवकांची युवाशक्ती वाया घालवली जाते आहे. भारतात गेल्या ४० वर्षात आली नव्हती इतकी मोठी बेरोजगारी मागच्या दहा वर्षांमध्ये आली आहे. भारतातले तरुण दिवसातले सात ते आठ तास मोबाइलवर फेसबुक आणि इंस्टाग्राम पाहण्यात घालवतो असं वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे.

राहुल गांधी यांनी काय म्हटलं आहे?
आपला देश हा कोट्यवधी युवाशक्तीचा देश आहे. मात्र आज युवकांची ही शक्ती पूर्णपणे वाया घालवली जाते आहे. आजचे तरुण हे नोकरी करत नाहीत कारण त्यांच्यासाठी नोकऱ्याच नाहीत. या तरुणांचे दिवसातले सात ते आठ तास हे मोबाइल फोनवर इंस्टाग्राम आणि फेसबुक पाहण्यात जातात. हे भारतातलं वास्तव आहे. तरुणांची शक्ती वाया जाते आहे.

एकीकडे शेतकऱ्यांवर अन्याय, तरुणांवर अन्याय आणि दुसरीकडे भारतातल्या दोन ते तीन अरबपती व्यापाऱ्यांना देशातली संपत्ती दिली जात आहे. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे काही तरुण आले मला म्हणाले अग्निवीर योजनेच्या आधी आम्हाला लष्करात घेण्यात आलं होतं. दीड लाख तरुणांना भारताच्या लष्कराने आणि वायुसेनेने घेतलं होतं. या सगळ्यांनी शारिरीक चाचणी पूर्ण केली होती. त्यांच्या नोकरीला मंजुरीही मिळाली होती. मोदी सरकारने अग्निवीर योजना आणली आणि या दीड लाख तरुणांना नोकरीत घेतलंच नाही. देशप्रेमामुळे हे सगळे तरुण लष्करात आणि वायुसेनेत नोकरी करायला गेले होते. हे तरुण सांगत होते सरकारने आमची खिल्ली उडवली. आमच्या गावात आमची चेष्टा केली जाते. हा अनुभव राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात सांगितला. त्यांना अग्निवीर योजनेतूनही नोकऱ्या दिल्या गेल्या नाहीत थेट घरी पाठवलं. असाही आरोप राहुल गांधी यांनी भाषणात म्हटलं आहे.

मोदी सरकार जे काही करतं आहे त्यामुळे देशाचा काही फायदा होणार नाही. मी संसदेत भाजपाच्या लोकांना विचारलं त्यांना मी म्हटलं भारत ९० लोक चालवतात त्यात अधिकारीही आहेत. त्यातले ओबीसी किती आहेत, दलित किती आहेत, आदिवासी किती आहे? हे जरा सांगा, भाजपा खासदार मूग गिळून गप्प बसले असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *