
नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आजच अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर लागलीच ईडीने कारवाई करून त्यांना अटक केली आहे. दरम्यान केजरीवाल यांच्या बंगल्याजवळ 144 कलम जारी करण्यात आले आहे. या ठिकाणी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी आम आदमी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने केजरीवाल् यांना अटक केली असतानाच, त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचे मोबाईलही जप्त केले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta