आमदार गणेश हुक्केरी यांची उपस्थिती : जलजीवन योजनेच्या कामासाठी २ कोटी मंजूर
निपाणी (वार्ता) : रामपूर येथील बस स्थानकापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या सुमारे ६०० मीटर मार्गाच्या डांबरीकरणासाठी आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार मोश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, सदर रस्ताकामाचा शुभारंभ करण्यात आल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
प्रारंभी भटजी बाबासाहेब इस्लामपुरे यांच्या पौरोहित्याखाली ग्राम पंचायत माजी उपाध्यक्षा अलका गोविंद पोवार, सुनीता गुरव व इतर उपस्थित महिलांच्या हस्ते जेसीबी मशिनचे पूजन करण्यातआले. ज्येष्ठ नागरिक तात्यासाहेब बंकापुरे, विद्याधर कागे, अण्णा तांदळे, सचिन पोवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. आमदार गणेश हुक्केरी यांच्याहस्ते कुदळ मारून रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी युवा ऊद्योजक सचिन पोवार म्हणाले, सदर रस्ता करण्यासाठी येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी होती. याची दखल घेऊन आमदार गणेश हुक्केरी यांनी जिल्हा पंचायतीच्या फंडातून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहेत. याशिवाय रामपूर आणि पांगिरे गावात प्रत्येक घराला नळ जोडणी करण्यासाठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत सुमारे २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, असे सांगितले.
यावेळी अभियंता जे. एम. खामकर, विनोद कागे, तात्यासाहेब बंकापुरे, अण्णा तांदळे, शशी नेसरे, विजय दावणे, सचिन पोवार, सूरज कुंभार, विश्वजित पाटील, सुनील संकपाळ, शशी मदने, महारुद्र जबडे, कुमार जाधव, बाळासो बंकापुरे, सचिन संकपाळ यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta