सौंदलगा : सहकार क्षेत्रात सौंदलगा प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचा दबदबा, संघाने १०४ वर्षात केलेली प्रगती व सभासदांच्यासाठी दिलेली सेवा महत्त्वाची, असे प्रतिपादन खासदार अण्णासाहेब जोल्ले, संचालक बीडीसीसी बँक बेळगाव यांनी सौंदलगा येथे प्राथमिक कृषी पत्तीन कडून बांधण्यात आलेल्या गोडाऊनचे उद्घाटन करताना आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोडाऊनचे उद्घाटन मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले. यानंतर हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत गायल्यानंतर दिव्य सानिध्य परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी समाधी मठ निपाणी, मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर चेअरमन संजय शिंत्रे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात सौंदलगा येथील पीकेपीएसच्या स्थापनेपासूनचा आढावा घेतला व हे गोडाऊन होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पुढे आपल्या अध्यक्षीय भाषणात खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की, नवीन गोडाऊन बघितल्यानंतर सहकाराची प्रगती दिसून येत आहे. अडीच एकर इतकी स्वताची मोठी जागा असणारी सौंदलग्यातील पीकेपीएस चिक्कोडी तालुक्यात जागे बाबतीत एक नंबर असावी हेही महत्त्वाचे आहे. प्रत्येक गावात नागरिकांना सवलती पाहिजे असतील तर तेथील पीकेपीएसचे स्थान महत्त्वाचे असते. तो विश्वास सभासदांनी सौंदलगा येथील पीकेपीएसवर दाखविला आहे. त्यामुळे सभासदांनी येथील संचालक मंडळाला निवडून देऊन सहकार्य केले आहे. त्यानंतर मंत्री शशिकला जोल्ले आपल्या भाषणात म्हणाल्या की सौंदलगा येथील पीकेपीएस सर्वांनी मिळून सहकार्यातून चालविली आहे. ही संस्था १०४ वर्षाची असून शेतकरी वर्गाच्या प्रगतीसाठी पीकेपीएस सारख्या संस्था असणे आवश्यक आहेत. आज देशात नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून शेतकरी वर्गास विविध सवलती मिळत आहेत. त्यामध्ये किसान सन्मान योजना, शेतकरी वर्गासाठी एफ पी ओ निर्माण केले आहेत. भारताचे भविष्य घडविण्यासाठी नरेंद्र मोदीजी पंतप्रधान व राज्यात भाजपचे सरकार येणे गरजेचे आहे. आज तुमच्यामुळेच मी दोन वेळा आमदार व मंत्री झाले. हे कधी विसरणार नाही. सौंदलगा गावात ३२ कोटीची विकास कामे झाली असून यापुढे ही विकास कामे होणार आहेत. यानंतर परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी आपल्या आशिर्वचन भाषणात संस्थेच्या प्रगतीची वाटचाल १०४ वर्षापासून असून संस्थेने केलेल्या प्रगती बद्दल कौतुक केले. यावेळी पीएलडी बँकेचे चेअरमन एस एस ढवणे, आर बी मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थितांमध्ये गणपती गाडीवड्डर, प्रकाश शिंदे, आनंदा सुरवसे, दादासाहेब कांबळे, अर्चना कोगनोळे, सुजाता चौगुले, दिलीप आडसुळ, मधुकर पाटील, सरोजनी जमदाडे, पीपिकेपीएस व्हा.चेअरमन डॉ. संजय आडसुळ, संचालक अप्पासाहेब ढवणे, महादेव कांबळे, सबगोंडा पाटील, संभाजी साळुंखे, भारतसिंग रजपुत, बी आर चौगुले, प्रवीण दावणे, संचालिका राजश्री मोरे, विमल पाटील, अंजना नाईक यासह सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार संचालक डॉ तानाजी पाटील यांनी मानले.
सौंदलगा, फोटो : पीकेपीएस गोडाऊनचे उदघाटण करतेवेळी मंत्री शशिकला जोल्ले शेजारी खासदार अण्णासाहेब जोल्ले,परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी व मान्यवर
Belgaum Varta Belgaum Varta