
साखरवाडीतील जवान कुंभार यांचा अपघाती मृत्यू : रात्री उशिरा अंत्यसंस्कार
निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडी भागातील जवान राजेंद्र पांडूरंग कुंभार (वय ४५ रा. साखरवाडी, निपाणी) यांचा फिरोजाबाद जवळील तोंदली रेल्वे स्टेशनजवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना ८ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता घडली होती. जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच या परिसरात दुःखाची छाया पसरली आहे.
जवान राजेंद्र कुंभार यांचे पार्थीव फिरोजाबादहून दिल्ली येथील मुख्यालयात नेण्यात आले. तेथून पुणे मार्गे शनिवारी रात्री उशिरा(ता.१०) निपाणीत आणण्यात आले. येथील बसवान न नगरातील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजेंद्र कुंभार हे गेल्या २२ वर्षापासून सैन्य दलात कार्यरत होते. नायक सुभेदार पदावर ते प्रयागराज येथे नोकरी करीत असताना सुट्टीकरिता येताना तोंदली रेल्वे स्टेशनजवळ अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर ही घटना त्यांच्या पत्नी व दोन भावांना कळविण्यात आली. त्यानंतर भाऊ व पत्नी हे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर फिरोजाबाद येथील शासकीय रूग्णलयात शवविच्छेदन करून पार्थीव दिल्ली येथील मुख्यालयात पाठविण्यात आले. तेथून पुणे मार्गे निपाणीला पार्थीव आणून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
दरम्यान शनिवारी रात्री उशिरा कमांडर राजेंद्र कुंभार यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी साखरवाडी परिसरात रांगोळ्या ते काढण्यात आल्या होत्या. अंत्ययात्रेमध्ये राजेंद्र कुंभार अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. रात्री सात वाजता सुमारास पत्नीने हंबरडा फोडला होता. यावेळी निपाणी साखरवाडी सह परिसरातील नागरिकांनी अंत्ययात्रेसाठी गर्दी केली होती. कमांडर राजेंद्र कुंभार यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विद्या संवर्धक मंडळामध्ये संस्थेमध्ये झाले होते. बारावीनंतर ते बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीच्या माध्यमातून सैन्य दरात भरती झाले होते. सुट्टीसाठी घरी परतत असताना त्यांच्यावर अपघात रुपी काळाने घाला घातला. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, भावजय, भाचा असा परिवार आहे. कुंभार यांच्या अकाली मृत्यूमुळे निपाणी व साखरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
यावेळी कमांडर प्रताप सिंग, कमांडर पी. रणजीत, प्रकाश कोपर्डे, जयराम मिरजकर, सुनील राऊत, अरुण आवळेकर, आशिष मिरजकर, संजय कुंभार, दीपक इंगवले, नगरसेवक संजय सांगावकर, चंद्रकांत कदम, रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पठाडे, खडके प्रमोद कुंभार, विजय पाटील, अनिल येरुडकर, अजित परळे, नियाज बडेखान यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
—
अमर रहेच्या घोषणा
जवान राजेंद्र कुंभार यांचा मृतदेह निपाणी शहरात दाखल होताच राजेंद्र कुंभार अमर रहे. भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. निपाणी शहरातील ही पहिलीच घटना असल्याने नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.
Belgaum Varta Belgaum Varta