सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे. एस. वाडकर हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. व्ही. यादव यांनी केले. दीप प्रज्वलन करून उद्घाटन भिवशी येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर व विद्यालयाचे माजी विद्यार्थी रविराज मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले. रविराज मगदूम यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास व खेळाविषयी माहिती दिली. क्रीडा शिक्षक बी. एम. शिंत्रे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. त्यानंतर एस. डी. कुंभार यांनी प्रत्यक्ष गोळा फेक करून स्पर्धेला सुरुवात केली. या स्पर्धेच्या वेळी सॉफ्टवेअर इंजिनिअर रविराज रघुनाथ मगदूम यांनी विद्यालयाला रोख 5000 रुपये देणगी दिली. या स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या मध्ये 100 मीटर धावणे, लांब उडी मारणे, गोळा फेकणे, थाळी फेकणे यामध्ये प्रथम संकेत कुंभार. 200 मीटर धावणे चारशे मीटर धावणे आठशे मीटर तसेच उंच उडीमध्ये धावणे आदित्य पाटील तर पंधराशे मीटर धावणे व तीन किलोमीटर धावणे व भालाफेक मध्ये आकाश साजरे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला. रिलेमध्ये रेड ग्रुप प्रथम क्रमांक हॅमर थ्रो मध्ये रोहन पाटील प्रथम, विद्यार्थ्यांच्या सांघिक खेळात रेड गट कबड्डी तर ग्रीन गटाने खोखो व हॉलीबॉल प्रथम क्रमांक मिळवला तर विद्यार्थिनींच्या मध्ये 100 मीटर धावणे 200 मीटर धावणे व लांब उडी मध्ये वर्धा कासार प्रथम तसेच 400 मीटर धावणे आठशे मीटर धावणे व पंधराशे मीटर धावणे, थाळीफेक गोळा फेक यामध्ये वैष्णवी बेनाडे प्रथम तीन किलोमीटर धावणे अंकिता माळी तीन किलोमीटर चालणे साक्षी कुंभार तर भालाफेकमध्ये पूजा काळुगडे प्रथम. मुलींच्या सांघिक खेळामध्ये पिंक गटाने कबड्डी व खो-खो प्रथम क्रमांक तर रिलेमध्ये रेड घटने प्रथम मिळवला या स्पर्धा पूर्ण करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांचे योगदान मिळाले.
Belgaum Varta Belgaum Varta