सफाई कामगारांचा इशारा : पालिकेसमोर ठिय्या आंदोलन
निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेतील सफाई कामगार बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहेत. त्यामुळे ४९ कामगारांना हंगामी ऐवजी सेवेत सामावून घ्यावे. यासह विविध मागण्यासाठी मंगळवारी (ता.३) दुपारी ३ वाजल्यापासून सफाई कामगारांनी नगरपालिकेसमोरच हे आंदोलन सुरू केले आहे. ७ तारखेपर्यंत सेवेत कायम न करून घेतल्यास ८ पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
पौरकार्मिक म्हणून ५२ कर्मचारी कार्यरत आहेत. तर ४९ कर्मचारी हंगामी म्हणून स्वच्छता काम करत आहेत. बऱ्याच कर्मचाऱ्यांची सफाई कामगार म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यापैकी काहीजण कार्यालयातच काम करत आहेत. त्यामुळे उर्वरित सफाई कामगारावर ताण पडत आहे. याशिवाय या कामगारांना शासनाच्या कोणत्याही सोयी सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे निरंतरपणे स्वच्छतेचे काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून त्यांना सरकारी सुविधा देण्यात याव्यात याबाबत बऱ्याचदा मागणी केली आहे. त्याकडे नगरपालिका पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अखेर सफाई कामगारांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. आठवड्याभरात मागण्याचे दखल न घेतल्यास आठवडाभर दिवसभर काम करून दुपारनंतर हे आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शहरातील स्वच्छतेचे काम बंद करणार असल्याचे कामगारांनी सांगितले.
ज्येष्ठ वकील अविनाश कट्टी यांनी आंदोलनस्थळी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला. या पुढील काळात स्वच्छता कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, वाहन चालक याची माहिती घेऊन नगरपालिकेने तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली. रयत संघटनेचे चिकोडी जिल्हाध्यक्ष राजू पवार यांनीही कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन न्याय मिळेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बाजूने लढणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन लोकरे, प्रा. एच. बी. ढवणे, आरेश सनदी, सुरेश हेगडे, आकाराम येड नाईक, दीपक राबते, सचिन कांबळे, विठ्ठल भोसले, चंद्रकांत कांबळे, आशा वाळके, उज्वला हेगडे, कमल कांबळे, मनीषा कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta