गावकऱ्यांच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : सांबरा (ता. जि. बेळगाव) येथे गावकऱ्यांच्यावतीने येत्या रविवार दि. 5 फेब्रुवारी 2023 रोजी कुस्ती आखाडा भरविण्यात येणार आहे.
सांबरा गावातील श्री मारुती मंदिरामध्ये नुकत्याच झालेल्या गावकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये कुस्ती आखाडा भरवण्यासंदर्भात विचारविनिमय करून 5 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. आखाड्याचे ठिकाण, मल्लांची जोड, देणगी जमा करणे, बैठक व्यवस्था यासह नियोजनाबाबत विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच शिवाजी चिंगळे, मुकुंद मुतगेकर, इराप्पा जोई, बाबू जोई, लक्ष्मण सुळेभावी आदींनी यावेळी विचार मांडले.
बैठकीला बाळू चिंगळी, परशराम हरजी, भरमा चिंगळी, कृष्णा जोई, शिवाजी मालाई, शिवानंद पाटील, भुजंग गिरमल, महेंद्र गोठे, प्रवीण ताडे, भुजंग धर्मोजी, मोहन हरजी, शीतलकुमार तिप्पाण्णाचे, यल्लाप्पा जोगानी, सिद्राई जाधव, नितीन चिंगळी, यल्लाप्पा हरजी यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे सदस्य आणि गावकरी उपस्थित होते.