खानापूर (प्रतिनिधी) : सध्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याने खानापूर तालुक्यातील लोंढा गुंजी दरम्यान असणारे रेल्वे फाटक बुधवारी दि. ४ व गुरूवारी दि. ५ जानेवारी असे दोन दिवस बंद राहणार आहे. या रेल्वे फाटकावरून होणारी वाहतूक दोन दिवस बंद राहिल. यावेळी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाने वाहतूक करावी व रेल्वे खात्याला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे खात्याचे अभियंते शशिधर यांनी खानापूर तालुका तहसीलदार, खानापूर पोलिस स्टेशन, बस डेपो मॅनेजर, तसेच संबंधीत बांधकाम खात्याच्या अधिकारी वर्गाला लेखीव्दारे दिली आहे.
यावेळी बीजेपी मिडीया प्रमुख राजेंद्र रायका यांनी ही लोंढा गुंजी दरम्यान रेल्वे फाटका वरून वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांना तसेच स्थानीक नागरिकांना रेल्वे फाटक बंद झाल्यास रेल्वे खात्याला सहकार्य करून वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करून रेल्वे फाटकांच्या कामाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.