Monday , April 20 2026
Breaking News

परशराम घाडी, चंद्रकला घाडी यांचा देहदानाचा संकल्प

Spread the love

 

बेळगाव : आनंदनगर, वडगाव येथील परशराम घाडी व चंद्रकला घाडी या दाम्पत्याने मरणोत्तर देहदान, नेत्रदान व त्वचा दानाचा संकल्प सोडला आहे. परशराम घाडी हे बेळगाव शहरातील विविध संस्थेत कार्यरत आहेत. एक यशस्वी विमा  एजंट म्हणूनही ते ओळखले जातात. सध्या ते मुख्य जीवन विमा सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी हा कौतुकास्पद निर्णय जायंट्स आय फाऊंडेशनच्या सहकार्याने घेतला आहे.

याकामी त्यांना जायंट्स आय फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवराज पाटील यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. नूतन वर्षात घाडी दाम्पत्याने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

रणझुंझार चौक, निलजी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love  बेळगाव : रणझुंझार चौक, निलजी येथे रणझुंझार परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *