खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप बुथ विजय दिन अभियानाला सोमवारी खानापूर भाजप कार्यालयात प्रारंभ करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल होते. तर मार्गदर्शक म्हणून कर्नाटक राज्याचे रयत संघटना राज्याध्यक्ष इराणा कडाडी होते. व्यासपीठावर खानापूर तालुक्यातील भाजपचे नेते उपस्थित होते.
प्रारंभी भारतमातेच्या फोटोचे पुजन मान्यवराच्याहस्ते करण्यात आले
यावेळी बोलतांना इराणा कडाडी म्हणाले की, राज्यासह देशात पुन्हा एकदा भाजप सरकार येणार आहे, असा विश्वास आहे. यासाठी प्रत्येक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी बुथ विजयी दिन अभियानात सहभागी होऊन भाजपचा ध्वज प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर उभारून विरोधकाना चांगलाच धक्का देऊ यासाठी दि. २ ते १२ जानेवरीपर्यंत अभियान सुरु राहणार आहे. यात सर्वानी सहभागी व्हा, असे आवाहन केले.
यावेळी भाजप नेत्यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला भाजपचे युवा नेते पंडित ओगले, मिडीया प्रमुख राजेंद्र रायका, प्रकाश निलजकर, विजय कामत, गजानन पाटील, सयाजी पाटील, मल्लाप्पा मारीहाळ, गुंडू तोपीनकट्टी, रवी बडगेर, शिवा मयेकर, नगरसेवक आपय्या कोडोळी, लक्ष्मण बामणे, लक्ष्मण झांजरे, परशराम चौगुले, बाळू वड्डेबैलकर आदी शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बुथ विजयी दिन अभियानाचा शुभारंभ भाजप नेते पंडित ओगले यांच्या घरावर भाजपचा ध्वज लावून करण्यात आला.