Saturday , February 8 2025
Breaking News

कॅपिटल वन आयोजित एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न

Spread the love

 

बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेच्या सांस्कृतिक दालना अंतर्गत गेली अकरा वर्षे एकांकिका स्पर्धेचे आयोजन दोन वेगवेगळ्या स्वतंत्र गटात म्हणजेच बेळगाव जिल्हा मर्यादित शालेय गट आणि आंतर राज्य भव्य खु ला गट असे करण्यात येते.
सदर स्पर्धेच्या आयोजनामध्ये संस्थेने कालानुरूप बदल करण्यात आले असून बेळगाव जिल्ह्यातील नाट्य कलाकारांना आणि परराज्यातून येणाऱ्या नाट्य स्पर्धकांना एक हक्काची रंगभूमी उपलब्ध करून दिली आहे.
याच अनुषंगाने संस्थेने यावर्षी देखील स्पर्धेचा दर्जा वाढावा आणि बेळगावकर नाट्यसिकांना वेगवेगळ्या विषयातील एका पेक्षा एक दर्जेदार एकांकिकाची मेजवानी मिळावी या दृष्टीने संस्थेने यंदा पहिल्यांदाच स्पर्धेसाठी प्राथमिक फेरी आयोजित केली होती. सदर प्राथमिक फेरीसाठी कर्नाटक महाराष्ट्र व गोवा या तीनही राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेसाठी एकूण 28 संघाने आपला सहभाग नोंदविला होता.
संस्थेने अभ्यासू परीक्षकांच्या मदतीने प्राथमिक फेरीतील एकूण 28 संघामधून 14 संघांची निवड केली आहे. या संघाची निवड ही संहिता आणि आभासी तत्वावर सखोल चर्चा करून निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धेसाठी सादरीकरण होणाऱ्या एकांकिका या एकापेक्षा एक वरचढ असून बेळगाव, मुंबई, सांगली, इस्लामपूर, इचलकरंजी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, जयसिंगपूर, गोवा येथील संघ आपले सादरीकरण करणार आहेत. बेळगाव जिल्हा मर्यादित शालेय गटासाठी देखील संघांची निवड करण्यात आली आहे.

सदर स्पर्धा आता एका मनोरंजक वळणावर आल्या असून संस्थेतर्फे एकांकिका स्पर्धेची तयारी देखील जोमात करण्यात येत आहे. यावर्षीच्या स्पर्धा दिनांक 9 जानेवारी 2023 आणि 10 जानेवारी 2023 रोजी बेळगाव शहराला लाभलेल्या वैभवशाली नाट्य परंपरा जोपासत असलेल्या लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले आहेत.

*** नाट्य रसिकांसाठी आवाहन****
ही स्पर्धा विनाशुल्क आयोजित केली असून एकांकिकेचे सादरीकरण दुपारी 2.00 ते रात्री 8.00 या कालावधीत होणार आहे. रसिक प्रेक्षकांनी आपल्या सोयीनुसार स्पर्धा पाहण्यास जरूर यावे पण प्रयोग सुरू असताना ये जा करु नये असे आवाहन संस्थेचे चेअरमन श्री. शिवाजीराव हंडे यांनी केले आहे.
याचबरोबर स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे संस्थेकडून कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खाजगी वैद्यकीय प्रतिष्ठान कायद्यासंदर्भात भारत असोसिएट्स संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहरातील रुग्णांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कर्नाटक खाजगी वैद्यकीय प्रतिष्ठान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *