६०० विद्यार्थ्यांनी केली कला सादर : मान्यवरांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलचे ५० वे सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयाचे अधिव्याख्याते डॉ. रघुनाथ कडाकणे, निपाणी रोटरी अध्यक्ष दिलीप पठाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्राचार्या स्नेहा घाटगे होत्या.
डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी, या शाळेची ५० वर्षांची पूर्तता म्हणजे त्याकाळच्या आधुनिक विचार आजतागायत सातत्याने चालविला जात आहे. आजही मॉडर्न शाळेतून देशाला चांगले नागरीक घडवून देण्याचे काम निरंतर सुरू ठेवण्याचे सांगितले.
रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पठाडे यांनी, निपाणीच्या शैक्षणिक क्षेत्रात सुविधा मिळवून देत कायम शाळेच्या माध्यमातून अमूलाग्र विकास झाले आहेत. येथील विद्यार्थ्यांना सर्व आधुनिक बदलत्या प्रवाहात आघाडीवर राहण्याचे धडे विद्यार्थ्यांना देण्याचे काम करण्यात येत असल्याचे सांगीतले.
भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि शाळेची ५० वर्षे पूर्ण झाल्याने आयोजित सुवर्णामृत कार्यक्रमात तब्बल६०० विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. त्यामध्ये रेट्रो ते मेट्रो, ग्लोबलाईजेशन, वुमेन एम्पॉवरमेंट, ग्रामीण ते शहरी असे अनेक विषय हाताळण्यात आले होते. कार्यक्रमास माजी विद्यार्थी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू, प्राचार्या, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.