निपाणी (वार्ता) : गेली पाच वर्ष श्री विठ्ठल माऊलीची निपाणी -पंढरपूर माघ वारी पायी दिंडी सोहळा यावर्षीही निपाणी ते श्री पंढरपूर माघवारी पायी दिंडी सोहळा होत आहे. या दिंडी संबंधित आढावा बैठक निपाणकर राजवाड्यामध्ये श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या उपस्थितीत झाली.
यावेळेस संस्थापक राजेंद्र मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विठू माउलींचे पूजन श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते करून दिंडी सुरुवात होणार आहे. त्यानंतर ही दिंडी बेडकिहाळ, नृसिंहवाडी, मिरज, नागज, सांगोला मार्गे १ फेब्रुवारीला पंढरपूर येथे दाखल होणार आहे. या वारीत १५० वारकरी सहभागी आहेत. या दिंडीचा सर्व खर्च राजेंद्र मोहिते व परिसरातील भाविक करणार आहेत. २ फेब्रुवारीला वारी परत निपाणीत येणार आहे.
बैठकीस आनंदा मोरे, श्रीधर मोहिते, संजय पाटील, श्रीकांत शेळके, प्रमोद वडके, महादेव सुतार, सर्जेराव सुतार, नर्मदा मोहिते, कल्पना मोहिते, शोभा संकपाळ मोहिते, उज्वला बुडके, राधाबाई बागे, वर्षाराणी दिवटे यांच्यासह वारकरी उपस्थित होते.