२०० रुपये किलो जिलेबी :१०० रुपयापुढे हार
निपाणी (वार्ता) : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर निपाणी शहरात जिलेबी चे स्टॉल, फुलांचे हार आणि गजर यांच्या स्टॉलवर खरेदीसाठी बुधवारी (ता.२५) सायंकाळी गर्दी झाली होती. यावर्षी जिलेबी प्रति किलो २०० रुपये, फुलांचे हार १०० रुपयावर तर गजरे २५ रुपयाच्या पुढे विक्री केली जात होती. त्यामुळे यंदा प्रजासत्ताक दिनाच्या खरेदीसाठी नागरिकांना चांगलाच खर्च करावा लागत आहे.
दरवर्षी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिन कार्यक्रमासाठी फुलांचे हार, विद्यार्थ्यांनी, महिला नोकरदार, शिक्षिका, शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना गजरे आवश्यक असतात. त्यानुसार प्रजासत्ताक दिनानिमित्त तयार होत असलेल्या जिलेबी मध्ये तेलाचे दर वाढल्याने जिलेबीचे दरही वाढले आहेत. फुले आणि गजरांची आवक कमी होत असल्याने त्यांचेही दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. एकंदरीत यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला महागाईच्या पारतंत्र्याची किनार लाभल्याचे निपाणी शहरात दिसत होते.
—
दर वाढूनही खरेदीसाठी गर्दी
यावर्षी जिलेबी साठी लागणारे सर्व साहित्य, फुल आणि गजरासाठी लागणाऱ्या फुलांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या दरातही वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta