प्राध्यापक प्रकाश नाईक : कोगनोळीत व्याख्यान
कोगनोळी : स्वतंत्र पूर्व काळात राजा फक्त राणीच्या पोटाला जन्माला येत होता. 26 जानेवारी 1950 पासून राजा मतपेटीतून जन्माला येऊ लागला, असे प्रतिपादन लेखक, विचारवंत प्राध्यापक प्रकाश नाईक यांनी केले.
कोगनोळी तालुका निपाणी येथील हालसिद्धनाथ नगर येथे 74 व्या प्रजासत्ताक दिनी आयोजित व्याख्यानात बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील होते.
नाईक पुढे म्हणाले, पूर्वी धर्माचा व चातुर्वेदाचा कायदा होता. स्त्रियांना ज्ञानबंदी होती. व्यवस्थेने जगणे मुश्किल केले होते. संविधान लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जन्म घ्यावा लागला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान देशाला अर्पण करण्यात आले. 26, जानेवारी 1950 ला संविधान अमलात येऊन भारत देश प्रजासत्ताक झाला.
भारतीय संविधान लिहीत असताना डॉक्टर आंबेडकरांनी जगातील सर्व संविधानाचा व विचारधारेचा अभ्यास करून जगातील सर्वाधिक लिखित भारताची राज्यघटना एकट्याने लिहिल्यामुळेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू यांनी त्यांना घटनेचे शिल्पकार असे संबोधले.
डॉक्टर आंबेडकरांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी तयार केलेले हिंदू कोड बिल संसदेत मान्य न झाल्याने राजीनामा दिला, असे मनोगत प्रा. नाईक यांनी व्यक्त केली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान प्रतीला पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करुन छोट्या वृक्षाला पाणी घालून सुरुवात केली.
स्वागत व प्रास्ताविक योगेश दाभाडे यांनी केले.
मयुरी कराचले, शीतल कराचले व पूनम मेस्त्री यांचा सत्कार केला.
यावेळी क्रांतीसुर्य फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल मोरे, भारतीय बौद्ध महासभेचे कोल्हापूर सचिव बबलू कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रविण भोसले, महेश जाधव, अमृत चव्हाण, सुनील कागले, सचिन निकम, बुद्धीराज घस्ते, सनि आवटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सेवन स्टार कराओके मनोरंजन कार्यक्रमाला देखील चांगला प्रतिसाद मिळाला.
Belgaum Varta Belgaum Varta