कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या दूधगंगा नदीच्या पुलानजीक अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याची घटना शुक्रवार तारीख 17 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील दूधगंगा नदी पात्रात मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. शेतकऱ्यांनी ताबडतोब कोगनोळी पोलिसांशी संपर्क साधून मृतदेहा बद्दल माहिती दिली.
घटनास्थळी पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पाहणी केली असता मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. मृतदेहाची तपासणी केली तर ओळख पटण्याचे कोणतेही साहित्य आढळले नाही.
मृतदेहावर लाल शर्ट, काळी पॅन्ट परिधान केला असून डोक्यावर काळे पांढरे केस आहेत. मृतदेहाचे अंदाजे वय 40 ते 45 आहे. हातावर डोंगर व हनुमानाचे गोंदणे आहे. संबंधित मृतदेहाची ओळख पटल्यास निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रविण गंगोळ, एएसआय व्ही एन पाटील, एम एन खानाप्पनूर, कोगनोळी पोलीस स्टेशनचे शिवप्रसाद कविडन्नावर, राजू गोरखनावर यांनी पाहणी करून मृतदेह निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात पाठवला.
Belgaum Varta Belgaum Varta