निपाणी (वार्ता) : येथील देवचंद महाविद्यालयात शेजारील न्यू संभाजीनगरमध्ये प्रीमियर लीग हाफपिच नाईट क्रिकेट स्पर्धा 2023 मधील सीजन-2 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये डॉन फायटर संघाने विजेतेपद पटकवले.
या स्पर्धेत वेद फायटर्स संघ, ब्ल्यू आर्मी संघ यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान सैफ पटेल, मॅन ऑफ द मॅचचा अभी बुडके, उत्कृष्ट फलंदाजाचा शकलेन जमादार, उत्कृष्ट गोलंदाजचा नागेश महंती, उत्कृष्ट फिल्डरचा बहुमान उमेश गंथडे यांना देण्यात आला. विजेत्या संघांना रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार, निपाणी ब्लॉक जेडीएस अध्यक्ष प्रसन्नकुमार गुजर, माजी नगराध्यक्षा सुनिता लाटकर, नगरसेवक शौकत मनेर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी निपाणी शहर जेडीएस अल्पसंख्यांक अध्यक्ष सैफ पटेल, विकास चव्हाण, किरण लोहार, पंकज गाडीवड्डर, सुलतान पकाली, नागेश महांती, सुभान नाईकवाडे, शिवाजी कदम, शंकर वर्मा, स्वप्नील पूनगे व क्रिकेट प्रेमी नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta