हुन्नरगीत हळदी – कुंकू कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेते मंडळी विकास कामे केल्याचा आव आणत आहेत. प्रत्यक्षात अनेक समस्यांना मतदारसंघातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र आपण सत्तेत नसतानाही अरिहंत उद्योग समूहातून समाज हिताची कामे केली आहेत. समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन सर्वसामान्यांच्या सेवेसाठी निवडणूक रिंगणात आहोत. त्यामुळे अफवा आणि आमिषाला बळी न पडता जागृत राहावे, असे आवाहन बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी केले. हुन्नरगी येथे युवा शक्ती व बोरगाव अरिहंत परिवारातर्फे आयोजित हळदी -कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सुभाष जोशी होते. प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी, विनयश्री अभिनंदन पाटील उपस्थित होत्या.
प्रारंभी शंकर कांबळे यांनी स्वागत केले. उत्तम पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. होम मिनिस्टर स्पर्धेत पूनम जाधव यांनी तिजोरी, विमल आरगे यांनी शिलाई मशीन मिळाले, सोनाली पाटील यांनी स्टॅन्ड फॅन, सुजाता मुरदंडे यांनी मिक्सर, राजश्री बरगाले, यांनी कुकर बक्षीस मिळवले. प्रा. सुभाष जोशी, विनयश्री पाटील, सुरज किल्लेदार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात हुन्नरगी ग्राम पंचायत अध्यक्षा अनिता सुतळे, उपाध्यक्ष मुन्सीलाल मुजावर यांनी उत्तम पाटील गटात प्रवेश केल्याबद्दल त्यांचा मान्यवरांचा सत्कार झाला.
यावेळी ग्राम पंचायत सदस्या बिस्मिला जमादार, सुजाता किल्लेदार, भारती बरगाले, ऋषभ चौगुले, कविता पाटील, आशाराणी येजरे, दादासो किल्लेदार, राजू पाटील-गावकामगार,
निरंजन पाटील-सरकार, गजानन कावडकर, प्रकाश गिंडे, प्रमोद पाटील, नबी मुल्ला, अमर स्वामी, दत्ता किल्लेदार, पिंटू जमादार, राहुल मुरदंडे, डॉ. राजेंद्र पाटील, आण्णाप्पा गोरडे, बजरंग शिंगे, विठ्ठल सूतळे, बाबासाहेब येजरे, महावीर पाटील, राजू अंबी, महादेव मुरदंडे, बसवराज बरगाले, अल्ताफ मुल्ला, आप्पासाहेब आडदांडे, अभिनंदन पाटील यांच्यासह उत्तम पाटील प्रेमी नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. माणिक पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta