
निपाणीत रविवारी युवक मेळाव्याचे आयोजन
निपाणी(वार्ता): आजचे तरुण हे उद्याचे भविष्य आणि देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. मी आपल्यातील एक कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे. तरीही अडचणी आणल्या जात आहेत. अशा या घाणेरड्या राजकारणाला ही युवाशक्तीच क्रांती करून मूठमाती देईल, असा ठाम विश्वास बोरगाव पीकेपीएसचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केला. उत्तम पाटील प्रेमी व युवाशक्ती संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने रविवारी (ता.१९) सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी चौक येथे रोजगाराभिमुख युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत बोलत ते होते.
प्रा.बाळासाहेब सूर्यवंशी यांनी स्वागत केले.
उत्तम पाटील म्हणाले, आतापर्यंत आमचे वडील सहकारनेते रावसाहेब पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करीत आहे. रावसाहेब पाटील (दादा) यांनी निपाणी व परिसरात काँग्रेस पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. गेल्या दहा वर्षापासून निपाणी मतदारसंघांमध्ये भाजपची सत्ता असल्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना कोणी वाली नव्हते. म्हणून २८ पैकी १७ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता काबीज केली. यापुढेही कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला सहकार्य करावे.
मोहन घस्ते, अक्षय भाट, अवधूत शिंदे, सचिन हेगडे, पिंटू चव्हाण, महेश पाटील, अमित पाटील यांच्यासह विविध क्रीडा, गणेश व तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करताना केवळ निवडणुका जवळ आल्या की तरुण कार्यकर्त्यांचा वापर राजकीय लोकांकडून करून घेतला जातो. उत्तम पाटील यांच्याकडून युवकांच्या आशा अपेक्षा मोठ्या आहेत. तेच भविष्यात अपेक्षा पूर्ण करू शकतात. त्यांना समर्थ साथ देण्यासाठी परिसरातील सर्व युवकांना एकत्र येवुन प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या विरोधात युवाशक्तीची ताकद दाखवून देण्याचे आवाहन केले.
बैठकीस सचिन फुटाणकर, पप्पू शिंदे, अवि सांगावकर, श्रीनिवास जांभळे सागर कुंभार, श्रीनाथ गोंधळी, निखिल हरदी, आकाश खवरे, अरविंद पारळे, रवी गुळगुळे, रोहित पाटील, अवी रावण, इम्रान बडेघर, रमीज मकानदार, शिरीष कमते, इम्रान मकानदार यांच्यासह विविध तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta