संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील :31वी वार्षिक सभा
निपाणी : ग्रामीण भागात स्थापन होऊन शहराकडे झोपावून सक्षम झालेल्या व सर्वसामान्यांच्या अर्थवाहिनी असा नावलौकिक मिळवलेल्या, राज्यात सहकार क्षेत्रात आदर्श ठरलेल्या श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेचे संचालक मंडळाचे मार्गदर्शन, प्रभावी व्यवस्थापन व सेवकांचे परिश्रम यांच्या जोरावर कोरोना संसर्गाच्या काळातही संस्थेमध्ये 139 कोटींनी ठेवीमध्ये वाढ झाली आहे. यावरून कोरोणाचे अडचणीचे काळात ही ग्राहकांच्या संस्थेवर विश्वास वाढला असल्याचे स्पष्ट होत आहे.
आर्थिक सालात 6 कोटी 5 लाखावर निव्वळ नफा झाल्याचे प्रतिपादन सहकार रत्न अरिहंत सौहार्द संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केले. बुधवारी बोरगाव येथील अरिहंत सभागृहात संस्थेच्या 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
रावसाहेब पाटील म्हणाले, गेल्या चार वर्षात नोटाबंदी, जीएसटी, कोरोना महापुर काळात जनतेची अर्थव्यवस्था कोलमडली असताना अरिहंत संस्थेने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत जागृतपणे कारभार करीत लॉकडाऊन काळात सेवकांनी ग्राहकांना चांगली सेवा दिली. त्यामुळे संस्थेवर सर्वांचा विश्वास वाढून गत वर्षात संस्थेच्या ठेवी, कर्ज वाटप, खेळते भांडवल, गुंतवणूक, सभासद संख्या निव्वळ नफा यामध्ये वाढ झाली आहे. संस्था फक्त आर्थिक समृद्धीस सिमित न राहता सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून अनेक लोकांचे कोरोना काळात हित जोपासले आहे. सुमारे 25 लाखाहून अधिक अर्थसहाय्य या काळात केल्याने आज संस्थेवर सभासदांचा विश्वास दृढ होत आहे. 60 गावांमध्ये 1600 पेक्षा जास्त कोरोना वॉरियर्सना अत्यावश्यक वस्तूंचे कीट, 4 ऑक्सिजन कॉन्स्ट्रटर, 5 हजार स्टीमर व सॅनिटायझर, मास्क, मुख्यमंत्री परिहार नितीस 7,77,777 रुपये, तसेच द.भा. जैन सभेचे हॉस्पिटल वैद्यकीय चिकित्सेसाठी 2 लाख 77 हजार रुपये, कर्नाटक जैन संवर्धन सहकारी यांना 1 लाख व कर्नाटकात जैन असोसिएशन बेंगळूरू यांना 1 लाख तसेच 18 अशा कार्यकर्त्यांना प्रत्येकी 3 हजार प्रमाणे 54 हजार प्रोत्साह धन देऊन सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी ही अरिहंत संस्था संकट समयी वरदायिनी ठरत आहे.
अहवाल सालात संस्थेत एकूण 12366 सभासद असून 4 कोटी 35 लाखांवर भागभांडवल आहे. 48 कोटी 20 लाखांवर निधी तर अहवाल साला अखेर संस्थेत एकूण 863 कोटी 46 लाख 55 हजार ठेव आहे. 17 कोटी 34 लाखांवर गुंतवणूक केली असून यंत्रोपकरण, वाहन खरेदी, लघुउद्योग, पाणीपुरवठा, घरबांधणी, यंत्रमाग, मशनरी, शेड बांधकाम व इतर व्यवसाय उभारण्याकरिता सभासदांना 575 कोटी 34 लाखांवर कर्ज वितरण केले आहे. अहवाल सालात संस्थेस 6 कोटी 05 लाखांवर निव्वळ नफा झाला आहे. संचालक मंडळाचे मार्गदर्शन व सर्वांच्या मागणीनुसार पुढील काळात विविध ठिकाणी संस्थेच्या 25 नव्या शाखा प्रारंभ करणार असून यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगितले.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांचा हस्ते दीप प्रज्वलन झाले. संस्थेचे प्रधान व्यवस्थापक अशोक बंकापुरे यांनी नफा तोटा ताळेबंद पत्रकाचे वाचन करून मंजुरी मिळवली.
युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, आपली संस्था फक्त सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात अग्रेसर आहे. सभासदांच्या शस्त्रक्रिया व औषधोपचारासाठी धर्मार्थ निधी, सभासद कल्याण निधी, शैक्षणिक मदत निधी, सभासद मरणोत्तर निधी तसेच नोकर कल्याण या योजनाही राबवित आहे. वीर शहीद जवानांच्या कुटुंबियांना धन सहाय, तसेच संस्थेच्या सभासद मुला-मुलींना स्कॉलरशिप योजनेअंतर्गत अहवाल सालात 109 विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने 4 लाख 20 हजार रुपयांची स्कॉलरशिप वाटप केले आहे. अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना आणि महापूर काळात संस्थेच्यावतीने केलेल्या कार्यामुळे आज अरिहंत ही घराघरात पोहोचले आहे याचा आपणास सार्थ अभिमान असल्याचे सांगितले.
या वर्षीचा उत्कृष्ट शाखा पुरस्कार म्हणून भोज शाखेस तसेच आदर्श व्यवस्थापक म्हणून चिक्कोडी शाखेचे वर्धमान पाटील व कर्मचारी म्हणून मानकापूर शाखेचे प्रमोद हतगिने यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास युवा उद्योजक अभिनंदन पाटील, दत्तचे संचालक शरदचंद्र पाठक, हलसिद्धनाथचे माजी उपाध्यक्ष राजू पाटील, मलकारी तेरादाले, निपाणीचे नगरसेवक दिलीप पठाडे, चेतन स्वामी, खडकलाट ग्रामपंचायत उपाध्यक्ष कुमार पाटील, निरंजन पाटील, रोहीत चौगुले, संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष शेट्टी, जयागौडा पाटील, अभयकुमार करोले, जयपाल नागावे, आप्पासाहेब कडोले, पिरगोंडा पाटील, भूजगोंडा पाटील, शरदकुमार लडगे, बाबासाहेब अफराज, श्रीकांत वसवाडे महावीर पाटील, राजकुमार खवाटे, शोक पडणाड, जिल्हा पंचायत सदस्य अमोल नाईक, डॉ. शंकर माळी, इमरान मकानदार, शशिकुमार गोरवाडे यांच्या सह व्यवस्थापक शांतिनाथ तेरदाळे, अभिनंदन बेनाडे, प्रकाश जंगटे यांच्यासह सर्वच शाखेचे संचालक सल्लागार समिती सभासद ठेवीदार व कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन आर. एस. पचंडी यांनी केले. आभार सतीश पाटील यांनी मानले.
—-
येथे होणार नव्या 25 शाखा
सर्वांच्या मागणीनुसार संस्थेच्या नवीन 25 शाखांची घोषणा यावेळी रावसाहेब पाटील यांनी केले. यामध्ये यमगर्णी, लखनापुर, भिवशी, शिरगुप्पी, महेश्वाडगी, दरुर, एकसंबा, येडूर, चंदुर, कोडणी, सत्ती, नांगनुर, बुदिहाळ, उदपुडी, कटकोळ, चंदरगी, यरगट्टी, लोकापुर, मुधोळ, रामदुर्ग, मुडलगी, कल्लोळी, कोन्नुर, कौजलगी व मुनोळी या गावांचा समावेश आहे.
Check Also
संकेश्वर स्थायी समिती सभापतीपदी प्रमोद होसमणी यांची निवड
Spread the love संकेश्वर : संकेश्वर नगरपालिकेची मंगळवारी बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत विविध विषयांवर …