Thursday , March 5 2026
Breaking News

पॅन कार्डला आधार सक्तीमुळे नागरिकांची तारांबळ

Spread the love
निपाणी परिसरातील चित्र : मुदत वाढवून देण्याची मागणी
निपाणी (वार्ता) : केंद्र सरकारने पॅनकार्ड- आधार लिंक करण्याची घोषणा केल्यानंतर 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता ३१ मार्चपर्यंत लिंक न केल्यास १ हजार रुपये पासून दहा हजार रुपये दंड करण्यासह पॅन क्रमांक निष्क्रिय होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे निपाणी व परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली आहे. याबाबत म्हणावी तशी जनजागृती न झाल्याने आधार लिंकसाठी मदत वाढवून देण्याची मागणी शहर व ग्रामीण भागातून होत आहे.
सध्याज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे त्यांची श्रेणी असणे आवश्यक आहे. नवीन पॅन कार्ड बनवायचे असल्यास दहा हजार रुपये दंड भरल्यानंतर नवीन पॅनकार्डसाठी अर्ज करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांची तारांबळ उडणार आहे. काही नागरिक एकापेक्षा जास्त पॅनकार्ड बनवून त्यांच्या सोयीनुसार वेगळ्या पद्धतीने वापरतात  बँकेत वेगवेगळे पॅनकार्ड देऊन व्यवसाय केले जात आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष कर टाळला जात आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन केंद्र सरकारने जुलै २०१७ पासून पॅन आधार लिंक करण्याचे आदेश दिले होते.
आधार लिंक न केल्यास आयटी रिटर्न भरता येणार नाही.पॅन कार्ड नसल्यास केवायसी लिंक करण्यात अडचण येणार असल्याचे म्हटले आहे.
www.incometax.gov.in वेबसाइटवर जाऊन आधार” लिंक उघडल्यावर माहिती उघडेल. १ हजार रुपये शुल्क भरून लिंकिंग करता येणार आहे. आधारशिवाय फक्त पॅन असलेले  ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सूट दिली आहे. ज्यांचे उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि ते कोणत्याही श्रेणीत येत नसेल तर त्यांना नवीन पॅनकार्डसाठी दंड भरण्याची गरज नाही.
——————————————————————
पॅन क्रमांक रद्द केल्यास इन्कम टॅक्स रिटर्न भरता येत नाही. आधार कार्ड लिंक नसल्यास ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख जमा करणे आणि ५० हजार रुपयांपेक्षा जास्त एफडी करणे शक्य होणार नाही.
—————————————————————-
‘पॅन कार्ड बाबत शहर आणि ग्रामीण भागात बँका किंवा महसूल खात्याने कोणत्याही प्रकारची जनजागृती केलेली नाही. आता अचानकच पॅन कार्डला आधार लिंक करण्याची सूचना केली आहे. तसे न झाल्यास अनेकांचे पॅन कार्ड रद्द होणार आहेत. शिवाय सर्वसामान्यांची दंड भरण्याची कुवत नाही. त्यामुळे ३१ मार्च नंतर काही काळ मदत वाढ देण्याची गरज आहे.’
– संजय सूर्यवंशी, व्यवसायिक, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारून नवी दिशा द्यावी; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक

Spread the love  पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *