Share
बोरगावमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद
निपाणी (वार्ता) : कोणत्याही कार्यात पारदर्शकता असनणे ही सहकारत्न रावसाहेब पाटील यांची शिकवण आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करा. कोणत्याही पदाची अपेक्षा करू नका, अशी शिकवण आहे. त्या अनुषंगाने आमचे काम सुरू असून सामान्य जनतेची सेवा हेच अरिहंत कुटुंबीयांची शिकवण असल्याचे मत बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
उत्तम पाटील म्हणाले, अनेक दशकापासून आपण दादांच्या नेतृत्वाखाली समाजसेवा करीत आहोत. आतापर्यंत सर्वसामान्याना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. दादांनी अनेकांना आमदार, खासदार केले. पण मी निवडणूक लढवीत असताना आज कोणाचाच पाठिंबा मला नाही. सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यामुळेच आपण घडलो आहोत. कार्यकर्ता हाच माझा पक्ष आहे. आपणास पक्षाकडून तिकीट मिळो अगर न मिळो आपण ही निवडणूक लढवणार आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक लढवीत आहे. कार्यकर्त्यांनी स्वतःची निवडणूक समजून आपणाला साथ द्यावी.
यावेळी मीनाक्षी पाटील, नगरसेवक अभयकुमार मगदूम, सुरेखा घाळे, शिवानंद राजमाने, अजित कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून उत्तम पाटील यांच्या विजयासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास विनयश्री पाटील, धनश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, नगरसेवक तुळसिदास वसवाडे, माणिक कुंभार, दिगंबर कांबळे, संगीता शिंगे, पिंटू कांबळे, प्रदीप माळी, रोहित माने-पाटील, वर्षा मनगुत्ते, अश्विनी पवार, भारती वसवाडे, रुक्साना अपराज, राजू मगदूम, बाबासाहेब वठारे, मनोज पाटील, अभयकुमार करोले, अनिल गुरव, अनिल ढोंगे, बाळासाहेब सातपुते, मारुती निकम, रमेश माळी, अशोक नेजे, अशोक बंकापुरे, प्रकाश जंगटे, यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
Post Views:
1,300
Belgaum Varta Belgaum Varta