Monday , September 21 2026
Breaking News

कोगनोळी टोलवर ५ लाख ८२ हजार जप्त

Spread the love

 

पोलिस बंदोबस्त : दुसऱ्या दिवशी कार्यवाही
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यामध्ये ५ लाख ८२ हजार ५०० रुपये सापडल्याची घटना शनिवारी (दि. ८) रोजी ३ च्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी तपासणी नाक्यावर कोल्हापूरहून गोव्याकडे जात असणाऱ्या खाजगी चारचाकी गाडीची तपासणी केली.
गाडीतील संजय शामराव डाकरे यांच्याकडे ५ लाख ८२ हजार ५०० रुपये असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेऊन पंचनामा केला. गोवा फिरण्यासाठी जात असून स्वतःला खर्चासाठी रक्कम सोबत घेतली असल्याचे संजय डाकरे यांनी सांगितले.
निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, उपनिरीक्षक कृष्णा नाईक, उपनिरीक्षक रेवांना गुरीकार, रमेश तलवार, संजय बारवाडकर, संजय खोत, महेश सांगावे, किरण पुजारी, शिवानंद चिकमट, शिवप्रसाद कडकनावर, संदिप गाडीवडर आदी कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *