
निपाणी (वार्ता) : उत्तम पाटील यांना सोमवारी (ता.१७) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बी. फॉर्म मिळाला होता. त्यानंतर मंगळवारी (ता.१८) उत्तम पाटील यांनी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून शहरातील विविध मार्गावरून दुचाकी रॅली काढून निवडणूक अधिकारी जी. एन. मंजुनाथस्वामी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गोपाळ नाईक, अशोककुमार असोदे, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष जावेद काझी, नगरसेवक शेरू बडेघर, बाळासाहेब देसाई सरकार, सचिन हेगडे, अरूण निकाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उत्तम पाटील यांनी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्यासाठी नुसार निपाणी मतदारसंघात अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी मतदारसंघाच्या विकासासाठी ही निवडणूक लढवीत असल्याचे सांगितले.
यावेळी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, नगरसेवक रवींद्र शिंदे, संजय सांगावकर, शौकत मनेर, सुनिल पाटील- भोज, माजी एपीएमसी संचालक राहुल पाटील, राजू पाटील-अकोळ, दत्तात्रय नाईक, दीपक सावंत, संजय पावले, दिलीप पठाडे, अनिस मुल्ला, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, निरंजन पाटील, गजानन कावडकर, शिरीष कमते, इम्रान मकानदार, प्रा. सचिन खोत, अनिल संकपाळ, लक्ष्मण आबणे, सचिन पोवार, निळकंठ मगदूम, प्रकाश गायकवाड यांच्यासह शहर आणि ग्रामीण भागातील उत्तम पाटील युवाशक्ती संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta