Wednesday , December 10 2025
Breaking News

मतदारसंघाच्या विकासासाठी निधर्मी जनता दलाला विजय करा

Spread the love

 

राजू पोवार; लखनपूर पडलिहाळ येथे सभा
निपाणी(वार्ता) : देशात वेगवेगळ्या पद्धतीने भाजपकडून शेतकरी, अल्पसंख्यांक लोकांवर अत्याचार सुरू आहेत. अल्पसंख्यांक महिलांनी कोणते कपडे घालावे हेदेखील भाजपवाले ठरवू लागले आहेत. महागाईकडे दुर्लक्ष करून जाती-धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे देशात परिवर्तन अटळ असून त्याची सुरुवात कर्नाटकातून होणार आहे. निपाणीतही भाजपच्या आमदारांना दोनवेळा संधी देऊनही लोकांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे यावेळी मतदारांनी माजी मुख्यमंत्री कुमार स्वामी मी यांचे हात बडबड करण्यासाठी आपणाला निवडून देऊन मतदारसंघाच्या विकासाची संधी द्यावी, असे आवाहन निधर्मी जनता दलाचे उमेदवार राजू पोवार यांनी केले. लखनिपूर पडलीहाळ परिसरात निधर्मी जनता दलाच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक रमेश पाटील यांनी केले.
राजू पोवार म्हणाले, भाजप सरकारने दिलेली आश्वासने आजपर्यंत पाळली नाहीत. ४०० चा सिलेंडर ५० रुपये वाढल्यानंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे भाजपचे मंत्री आज १२०० रुपये सिलेंडर झाला तरी गप्प आहेत. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्किल बनले आहे. त्यामुळे देशाचे आणि कर्नाटकाचे भवितव्य घडविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. माजी मुख्यमंत्री कुमार स्वामी यांनी जात धर्म न पाहता येईल त्याचे काम केल्याने त्यांचा पाठिंबा वाढत आहे. अशावेळी कर्नाटकात निधर्मी जनता दल बळकट करण्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षाला विजयी करावे. कर्नाटक राज्यामध्ये सत्तांतर अटळ आहे. सत्ता किंवा पद नसतानाही प्रत्येक गरजूसह शेतकऱ्यांच्या अडचणीच्या वेळी मदत करून दिलासा दिला आहे.
रमेश पाटील यांनी, नागरिकांनी सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना बळी न पडता निधर्मी जनता दलाचे उमेदवार राजू पोवार यांना मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन केले. यावेळी लखनपूर,पडलीहाळ व परिसरातील शेतकऱ्यासह नागरिकांनी जनता दलाचे उमेदवार राजू पोवार यांना पाठिंबा देऊन त्यांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

Spread the love  चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *