Wednesday , March 4 2026
Breaking News

केनवडे जवळील अपघातात बोरगावची महिला ठार

Spread the love

 

दुचाकी मोटारीची धडक : एक जखमी

निपाणी (वार्ता) : कागल- निढोरी मार्गावर केनवडे नाजिक असणाऱ्या वाघजाई घाटात मोटारसायकल व मोटारीची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात बोरगावची महिला जागीच ठार झाली. तर एक जण जखमी झाला आहे. संगीता सुनिल कुंभार (वय ४०, रा. कुंभार माळ बोरगाव, ता. निपाणी) असे मृत महिलेचे नाव असून शुभम सुनील कुंभार (वय २०)हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, बोरगाव येथील संगीता कुंभार या आपला मुलगा शुभम याच्या मोपेड मोटार सायकल वरून देवदर्शनासाठी आदमापुरला चालल्या होत्या. दरम्यान कागलच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीला दुचाकीने डाव्या बाजूला जोराची धडक दिली. या अपघातात मोपेडवरील संगीता कुंभार या खाली कोसळल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
याबाबत शुभम कुंभार याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कागल पोलीस अधिक तपास करीत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून मयत संगीता कुंभार या बोरगाव येथील कन्नड प्राथमिक शाळेत अक्षरदासोह योजनेत काम करत होत्या. विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन यामध्ये त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. शाळेतील त्यांचा परोपकारी स्वभाव हा वाखाणासारखा होता. देव दर्शनाला जात असताना मुलाच्या डोळ्यासमोरच आईचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *