नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन : खराब रस्त्यासह पथदीप नसल्याने अडचण
निपाणी : येथील प्रभाग क्रमांक 31 मध्ये नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मुलभूत सुविधा देण्यात कर्मचारी कमी पडत आहेत. त्यामुळे सोमवारी येथील नागरिकांनी शासन नियुक्त नगरसेवक दत्तात्रेय जोत्रे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष जयवंत भाटले यांना निवेदन देत प्रभाग क्रमांक 31मधील समस्या सोडविण्याची मागणी केली.
निवेदनामधील माहिती अशी, प्रभाग क्रमांक 31 मधील लेटेक्स कॉलनी परिसरातील बिरोबा मंदिराच्या मागील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. यामुळे स्थानिक नागरिक व वाहनधारकांना त्रास होत आहे. हा रस्ता तात्काळ करावा, रस्त्याच्या दुतर्फा गटार बांधकाम करावे तसेच परिसरात अनेक ठिकाणी पथदीप बंद पडले आहेत ते सुरू करावेत व उघड्यावरील कचर्याची समस्याही निकाली काढावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष भाटले यांनी स्वच्छता कर्मचार्यांना तात्काळ प्रभाग 31 मध्ये स्वच्छता कामे हाती घेण्याच्या सूचना केल्या. तसेच येथील सर्व समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.
यावेळी नामदेव चौगुले, आर. जी. पवार, जगन्नाथ लोखंडे, सुधीर गंगाधर, प्रमोद कांबळे, पी. एस. कांबळे, रामचंद्र पाटील, विरुपाक्ष बडिगेर, अनिल चौगुले, स्वराज्य पोटे, महादेव पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …