Monday , December 8 2025
Breaking News

वीज दरवाढीच्या निषेधार्थ विणकर संघटनेची निदर्शने

Spread the love

 

हेस्कॉम पोलीस ठाण्याला निवेदन; मुख्यमंत्र्यांच्या चर्चेला परवानगी द्यावी

निपाणी (वार्ता) : राज्य सरकारने वीजदरात वाढ केल्याने यंत्रमान विणकर अडचणीत आले आहेत. सरकारने वीज बिल कमी करावे, या मागणीसाठी मानकापूर पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने सदलगा हेस्कॉम बोरगाव विभाग व सदलगा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
नियोजनाची माहिती अशी, घरगुती आणि पावरलूम कनेक्शन असणाऱ्यांची ५५ टक्के वीज बिल वाढून आले आहे. वाढीव बिल वसुल करु नये व बिलासाठी तगादा लावू नये. गृहज्योती योजनेंतर्गत वीज मोफत असल्याचे राज्य सरकार सांगत आहे. तर दुसरीकडे विजेचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले आहेत. त्यामुळे विणकर आर्थिक संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर व्यावसायिक विणकरांच्या हक्कासाठी मुख्यमंत्र्यांनी विणकरांच्या शिष्टमंडळासह चर्चेला परवानगी द्यावी.
मानकापूर यंत्रमाग विणकर असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुन कुंभार म्हणाले, निपाणी, चिक्कोडी तालुक्यातील गावांमध्ये वीजेवर आधारित यंत्रमाग अधिक आहेत. पण कोणतीही नोटीस न देता हेस्कॉमने बिलात ५५ टक्के वाढ केली आहे. निवडणुकीपूर्वी सिद्धरामय्या विरोधी पक्षनेते असताना त्यांनी १० एचपीपर्यंत मोफत वीज देण्याचे व त्यापुढील वीजमागांना १ रुपये प्रतियुनिट दराने वीज पुरवण्याचे आश्वासन दिले होते. पण आता हेस्कॉमकडून जबरी दरवाढ करून वीजबिले देण्यात येत आहे. ते थांबवावे अशी, मागणी त्यांनी केली.
यावेळी प्रदेश अध्यक्ष शिवलिंग टिरकी, शुभम साळुंखे सोमनाथ परकाळे, भिमराव खोत, सुनील कुंभार, आण्णासो नागराळे, अनिल पाटील, कृष्णा गोरंबे, लक्ष्मण दोनवडे लक्ष्मण कदम, प्रकाश स्वामी, इरगोंडा झिणगे यांच्यासह यंत्रमानधारक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळ खून

Spread the love  धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *