निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित श्री अरुण शामराव पाटील हायस्कूल व श्री पी. जी. विद्यामंदिर स्तवनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा कार्यक्रम, रेसलिंग अकॅडमी उद्घाटन व तायक्वांदो सेंटर म्हणून स्तवनिधीला मिळालेला मान अशा त्रिवेणी कार्यक्रम साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संचालक महावीर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष पोटी-भुवनेश्वर (तायक्वांदो प्रशिक्षक) उपस्थित होते.
एस. पी. बाबन्नावर यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. पूजा पाटील यांनी सरस्वती पूजनाने केले. संतोष पोटी यांनी दोन मुलीकडून तायक्वांदोची प्रात्यक्षिक करून दाखवले. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने ए. एस. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एस. तेरदाळ व पी. जी. विद्यामंदिरचे मुख्याध्यापक बी. बी. दादन्नावर यांचा विद्यार्थ्यांनी सत्कार केला.
महावीर पाटील यांनी, विद्यार्थ्यांनी जीवनात आई-वडील असेपर्यंत त्यांची सेवा करा.त्यांना कधीही न विसरण्याचे आवाहन केले. जे. डी. कोरडे यांनी सूत्रसंचालन तर पी. बी. मानगावे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta