निपाणी (वार्ता) : येथील महात्मा बसवेश्वर सौहार्दमध्ये डॉक्टर्स डे व सी.ए. डे उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त डॉ. सी बी कुरबेट्टी, डॉ. एस. आर. पाटील, किशोर बाली (सी.ए) अनिमेष कुरबेट्टी, श्रीमंधर होनवडेयांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. सी बी कुरबेट्टी म्हणाले, महात्मा बसवेश्वर संस्थेमध्ये सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय, शैक्षणिक विषयातील मातब्बर मंडळींचा संचालक मंडळामध्ये समावेश आहे. आपल्या कुशाग्र बुद्धीने कर्मचाऱ्यांसह सर्व सभासदांचे हित चिंतून सर्व आघाड्यावर संस्थेने नावलौकिक मिळवत पाचशे कोटींच्या ठेवीकडे वाटचाल केली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची तब्येत बरी नसताना त्यांच्यावर डॉ.बिधानचंद्र रॉय यांनी उपचार केले होते. या डॉक्टरांच्या समर्पित भावनेची आठवण म्हणून देशामध्ये १ जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्याच दिवशी भारतामध्ये सी ए. डे म्हणून साजरा केला जातो. १ जुलै १९४९ मध्ये ही संस्था स्थापन झाली आहे. आतापर्यंत देशामध्ये अडीच लाखाहून अधिक सदस्य सी. ए. म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जात असल्याचे सांगितले.
संचालक श्रीकांत परमणे म्हणाले, संस्थेचे संस्थापक अध्यक्षांनी यनिपाणी व भागातील गरजू लोकांची मोफत उपचार करत आशीर्वाद मिळवले. त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर संस्थेस नावारूपास आणण्यास हातभार लावला आहे.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शेट्टी, संचालक प्रताप पट्टणशेट्टी, श्रीकांत परमणे, महेश बागेवाड़ी, सदानंद दुमाले, अशोक लिगाडे, प्रताप मेत्राणी, पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सदाशीव धनगर, दिनेश पाटील , मुख्य शाखा व्यवस्थापकशशिकांत आदन्नावर व कर्मचारी उपस्थित होते. सुजाता जाधव यांनी सूत्रसंचालन तर सुरज घोडके यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta