Thursday , March 5 2026
Breaking News

दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर

Spread the love

 

कोगनोळी : कोगनोळी येथून राष्ट्रीय महामार्ग जवळ असणाऱ्या दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर आले आहे.
गुरुवार तारीख 20 व शुक्रवार तारीख 21 रोजी पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे.
दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या लोकांना पुराचा धोका वाढला आहे.
नदीकाठी असणाऱ्या शेतीमध्ये पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे गावातील गटारी व ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. सुरु झालेला पाऊस कोकण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात असल्यानेच दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या कोगनोळी व परिसरामध्ये राहून राहून मोठ्या पावसाच्या सरी पडत आहेत. आणखी दोन-चार दिवस असाच पाऊस राहिला तर दूधगंगा नदीचे पाणी लगतच असणाऱ्या गावाशेजारील वस्तीत शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.
परिसरात सुरू झालेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीची कामे जिथल्या तिथे थांबले आहेत.
परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नदी पाणी पातळीत वाढ होत चालली आहे. सन 20 21 सालामध्ये झालेल्या पावसामुळे व दूधगंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक लोकांना स्थलांतर करावे लागले होते. सध्या पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिसरातील लोकांना पुन्हा स्थलांतर करावे लागणार की काय अशी भीती व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारून नवी दिशा द्यावी; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक

Spread the love  पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *