उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा सूर्यवंशी; दोन्ही निवडी बिनविरोध
निपाणी (वार्ता) : लखनापूर-पडलीहाळ ग्रुप ग्रामपंचायत अध्यक्षपदी काँग्रेसच्या बेबीजान शिरकोळी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा सूर्यवंशी निवड झाली. अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाले त्यामुळे या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी जी.डी. मंकाळे यांनी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांनी गुलाबाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी केली.
नूतन अध्यक्षा बेबीजान शिरकोळी यांनी, माजी आमदार काकासाहेब पाटील, सुभाष जोशी, उत्तम पाटील यांच्या सहकार्याने आपल्याला अध्यक्षपद मिळाले आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून या पूर्ण काळात लखनपूर आणि पडलीहाळ या दोन्ही गावात विकास कामे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. उपाध्यक्षा सुरेखा सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी निकु पाटील, श्रीनिवास संकपाळ, लक्ष्मीबाई मगदूम, विनायक पाटील, रुक्मिणी भोसले, जहांगीर शिरकोळी, हालशुगर संचालक समीत सासणे, गीता नाईक, दिलीप कांबळे, संभाजी पाटील, संतोष केसरकर, लियाकत शिरकोळी, पंकज घाडगे, अनिल शिंत्रे, अरविंद पाटील, रणजीत जाधव, इनायत शिरकोळी, मुन्ना पटेल, संतोष मोरे, अल्लाउद्दीन मुल्ला, अनिल नाईक, निवास कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta