Thursday , March 5 2026
Breaking News

‘मॉडर्न’च्या विद्यार्थ्यांनी केले सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक

Spread the love

 

नाथाजीराव हलगेकर स्मृतिदिनानिमित्त उपक्रम

निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील शैक्षणिक क्रांतीचेआद्य हितचिंतक, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते व
शिक्षण महर्षी नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांच्या अठराव्या स्मृतिदिनानिमित्त येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून निपाणी नगरी स्वच्छ आणि सुंदर करणाऱ्या कामगार बंधू आणि भगिनींचे कौतुक करून आभार मानले.
दरवर्षी नाथाजीराव हलगेकर यांचा स्मृतिदिन हा शैक्षणिक उपक्रम दिन म्हणून राबविण्यात येतो. विद्यार्थ्यांना परोपकाराच्या उपकाराची जाणीव असणे. आणि आपण काही समाजाचे देणे लागतो. ही भावना विद्यार्थ्यांच्या मध्ये रूजविणे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आपल्या निर्मळ अखंडित सेवेने निपाणी नगरी स्वच्छ, सुंदर ठेवणाऱ्या नगरपालिका कर्मचाऱ्यांचे विद्यार्थ्यांनी आभार मानले. त्यांनी स्वतः तयार केलेले ग्रीटिंग कार्ड्स देऊन त्यांच्या सत्कार केला. विद्यार्थ्यांच्या या कृतज्ञतेच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांना प्राचार्या स्नेहा घाटगे, शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‍शाळेच्या प्राचार्या स्नेहा घाटगे, स्वाती पाटील, धनश्री लोहार, अर्चना जोरापुरे, सुकुमार गोरवाडे, सुधाकर पवार, शिवानंद कुंभार,‌ सुरेश गुरव, ज्योती खोत उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारून नवी दिशा द्यावी; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक

Spread the love  पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *