नुकसानीचा अहवाल तयार; वर्गवारी नुसार मिळणार भरपाई
निपाणी (वार्ता) : गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे निपाणी तालुक्यात रविवारपर्यंत (ता. ६) सुमारे ३१ घरांची झाली आहे. झालेल्या घरांचा अहवाल तहसील कार्यालयाने बनविला असून तो जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. पडझडीच्या प्रभागात ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत भरपाई मिळणार आहे.
शहरासह परिसरात काही दिवसांपूर्वी पावसाने झोडपून काढलेसंततधार पावसामुळे नदी, ओढ नाल्यांच्या पातळीत वाढ होऊन तालुक्यातील सर्व बंधारे व नदी काठावरील पिके पाण्याखाली गेली होती. याकाळात काही गावांत घरांची पडझड झाली. पाऊस सुरू असताना घरांच्या सर्वेक्षणाने आदेश नव्हते. पण, पाऊस ओसरल्यावर संबंधित गावातील तलाठी, पंचायत विकास अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांची पथके नेमून परांच्या पडझडीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
घरासोबत फोटो जीपीएस करण्याचे पंचनामेही झालेआहेत. पडझडीच्या प्रमाणात ए, बी, सी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ७५ ते १०० टक्के पडझड झाल्यास ५ लाख, २५ ते ७५ साठी ३ लाख आणि २५ झाली असल्यास ५० हजार रुपयांपर्यंत भरपाईचे प्रमाण आहे. २०१९ मध्ये घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. त्या तुलनेत आता नुकसान झालेल्या घरांची संख्या अल्प आहे. जिल्हा प्रशासनाकडे अहवाल पाठविला असून त्याला मंजुरी मिळाल्यावर लाभाथ्यांच्या खात्यावर रकम जमा होणार आहे.
——————————————————————
‘शहरासह तालुक्यातील १७ गावांमध्ये ३१ घरांच्या पडझडीचा प्राप्त झाला आहे. त्यानुसार संबंधित घरांचा पंचनामा झाला असून अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेले नाही; मात्र आदेश आल्यानंतर पीक नुकसानीची पाहणीही होणार आहे.
-मुजफ्फर बळीगार, तहसीलदार, निपाणी