देवचंदमध्ये निबंध स्पर्धा
निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांना उज्वल यश संपादन करण्यासाठी स्पर्धेत उतरणे आवश्यक आहे. निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. व त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळते. विद्यार्थ्यांच्याकडे सुप्त गुण असतात, हे सुप्त गुण विकसित करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केले जाते. उज्वल यशासाठी स्पर्धा आवश्यक आहे, असे मत शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कोल्हापूर जिल्हा समन्वयक संजय पाटील यांनी व्यक्त केले. केंद्र सरकार मार्फत ‘आजादी का अमृतमहोत्सव हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून देवचंद कॉलेज अर्जुननगर राष्ट्रीय सेवा योजना (कनिष्ठ विभाग) यांच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
ते म्हणाले आजच्या स्पर्धेचे युगात विद्यार्थ्यांना आपली मत योग्य पणाने मांडणे आवश्यक आहे. हे मत व्यक्त करताना असताना लेखणी अत्यंत महत्त्वाचे आहे. लेखणीतून आपल्या विचारांची ओळख सर्वांना होते निबंध स्पर्धेतून विद्यार्थ्यांना आपले विचार व्यक्त करता येतात. विविध क्षेत्रातील आपली कल्पना विचार तसेच भूतकाळातील व तत्कालीन काळातील घटना मांडता येतात. संपूर्ण भारता आजादी का अमृत महोत्सव सुरू आहे. या निमित्ताने स्तुत्य उपक्रम राष्ट्रीय सेवा योजनेच्या कनिष्ठ विभागाने केला आहे. प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात. यातून भविष्यकाळातील जडणघडणीतील विजय रुजविण्यास मदत होते, असे त्यांनी मत व्यक्त केले.
यावेळी निपाणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडे, नंद्याळचे सरपंच प्रदीप कराडे, प्राचार्या जी. डी. इंगळे, उपप्राचार्य ए. डी. पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राहुल घटेकरी, प्रा.ए. ए. कुराडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, स्वयंसेविका, स्पर्धक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta