निपाणी (वार्ता) : श्री.सद्गुरू स्वामी महाराज यांच्या ५१ व्या पुरुषोत्तम मास त्रैमासिक पुण्यतिथी उत्सवानिमित्त नाशिक पंतभक्त परिवारातर्फे नाशिक येथे महामेळावा व बोधपीठ आयोजित करण्यात आला होता. यावेळी व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल अक्कोळ येथील डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांचा श्रीपंत बोधपीठाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत पंतबाळेकुंद्री (ठाणे) यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
बाळेकुंद्री येथील श्री दत्त संस्थानचे ट्रस्टी म्हणून डॉ. संजय पंतबाळेकुंद्री हे कार्यरत आहेत. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना समाजातील व्याधींनी त्रस्त झालेल्याना रोगमुक्त करून आरोग्य संपन्न करण्याचा वसा घेतला आहे. प्लेगच्या साथीपासून ते अद्यापही कार्यरत आहेत. कोविड-१९ महामारीच्या कालखंडात त्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता निरंतरपणे वैद्यकीय सेवा दिली आहे. याशिवाय त्यांनी केलेल्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध भागातील पंत भक्त व मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta