कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांचा सहभाग; आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्धार
निपाणी (वार्ता) : दूधगंगा बचाव कृती समितीच्याच्या वतीने कोल्हापूर येथील शासकीय विश्रागृहात महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील नेत्यांची सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्यामध्ये कर्नाटक सीमा भागातील नेते मंडळीसह शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहरास सुळकुड योजनेतून पाणी देण्यास विरोध दर्शवला. शिवाय या पुढील काळात होणाऱ्या सर्व आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी, सुळकुड येथील दूधगंगेतील पाणी इचलकरंजीला दिल्यास कर्नाटक सीमाभागातील पुण्याच्या पाणी योजनेसह शेती पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे या भागातील सर्वसामान्य नागरिकासह शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे दूधगंगा नदीचे पाणी इचलकरंजी शहराला देण्यास विरोध असल्याचे सांगितले.
बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी, सुळकुड येथून दूधगंगेचे पाणी इचलकरंजी शहराला देण्याची मागणी होत आहे. हे पाणी दिल्यास कर्नाटक सीमाभागातील ६७ गावांना निरंतरपणे पाणीटंचाई जाणवणार आहे. दूधगंगेचे पाणी हे सीमा भागातील नागरिकांच्या हक्काचे पाणी त्यामुळे या योजनेला आपणांसह सीमा भागातील नागरिकांचा विरोध आहे. तरीही सदरचे पाणी इचलकरंजीला नेण्याचा प्रयत्न केल्यास सर्वपक्षीय नेत्यासावेत आपण आंदोलन करण्यास तयार असल्याचे सांगितले.
यावेळी नामदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, शाहू साखरचे राजे समरजीतसिंह घाटगे, माजी मंत्री व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, मुरगूडचे प्रवीणसिंह पाटील, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती कृष्णात बापू पाटील, मुरगूडचे नगराध्यक्ष रजेखान जामदार, गोकुळचे संचालक अंबरीशसिंह घाटगे, वीरेंद्र मंडलिक, प्रकाश गायकवाड, कोगनोळी पीकेपीएसचे अमोल पाटील, निरंजन पाटील -सरकार, के. डी. पाटील, गजबरवाडीचे शिवाजी निकम यांच्यासह सीमाभागातील गावातील मान्यवर, शेतकरी, कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta