उपनिरीक्षक शिवराज नायकवडी : मध्यवर्ती रिक्षा संघटनेतर्फे सत्कार
निपाणी (वार्ता) : सध्या मुलांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार संबंधित क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. चांगल्या प्रकारे त्यांना पाठबळ दिल्यास ते विद्यार्थी निश्चित ध्येय गाठू शकतात, असे मत ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी यांनी व्यक्त केले. उत्तर कर्नाटक रिक्षा चालक-मालक संघटना व येथील मध्यवर्ती रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे भारतीय लष्करात भरती झालेले युवक आणि नूतन पोलीस उपनिरीक्षक आणि मंडल पोलीस निरीक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका उमादेवी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी त्यांच्यासह लष्करात भरती झालेल्या शुभांगी केसरकर, नंदिनी सोनवणे, प्रथमेश पाटील, ऋषिकेश मेंडगुदले, सुरज मलाबादे, आकाश सुतार, प्रथमेश मलाबदे, अमन सय्यद या युवकांचा सत्कार झाला.
उपनिरीक्षिका उमादेवी यांनी, सध्याची पिढी भारत मातेच्या सेवेसाठी पुढे आली आहे. समाज बांधवांनी एकजुटीने मुलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. युवकांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी मध्यवर्ती रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष गजानन खापे, उपाध्यक्ष प्रवीण झळके, खजिनदार संजय शास्त्री, सेक्रेटरी दीपक जोतावर, निपाणी तालुका उपाध्यक्ष राकेश हुक्केरी, शाम टिकारे, दिलीप साळुंखे, विजय कांबळे शिवानंद वसेदार, हसन मकानदार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta