मंडल पोलीस निरीक्षक तळवार : गणेशोत्सवाबाबत शांतता बैठक
निपाणी (वार्ता) : गणेशोत्सव सर्वांना शांततेत साजरा करावयाचा असून सर्व मंडळानी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. गणेश विसर्जन मिरवणूकीत डॉल्बी वापरण्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे. इतर किरकोळ आवाजाच्या साधना बाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. यंदा पर्जन्यमान कमी असल्याने मंडळांनी पीओपी ऐवजी शाडूच्या गणेश मोर्चा प्रतिष्ठापना करून पर्यावरणाचे प्रदूषण टाळण्याचे आवाहन मंडळ पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी केले.
येथील पोलिस ठाणे अवारात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर सार्वजनिक गणेश मंडळाची शांतता बैठक झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. गुन्हा अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक डी.बी कोतवाल यांनी स्वागत केले.
मंडळ पोलीस निरीक्षक तळवार म्हणाले, गणेश मंडळानी नगरपालिका, ग्रामपंचायत पोलिस, हेस्कॉमची परवानगी घेऊनच गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. मंडप घालताना रहदारीला अडचण न करता मंडपात सदस्यांनी २४ तास सुरक्षा ठेवावी.मिरवणूक ५ मिनीटापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी थांबवू नये. कोणतीही अडचण आल्यास त्याबाबत पोलिसांना तात्काळ नाहीती द्यावी. उत्सवात सांस्कृतीक कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे. नियमांचे पालन करणाऱ्या मंडळांना प्रशासनाचे सहकार्य राहील. गणेश मंडळाची गैरसोय टाळण्यासाठी सिंगल विंडो उपक्रम हाती घेणार आहे. याशिवाय पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करणाऱ्या तीन मंडळांना बक्षीस देण्यात येणार असल्याचे सांगितले.
नगरपालिकेतील आरोग्य विभागाचे अभियंते विनायक जाधव यांनी, गणेश विसर्जनासाठी शहरात चार ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. पाण्याचे प्रदूषण टाळण्यासह जलचर प्राण्यांचा धोका कमी करण्यासाठी गणेश मंडळासह नागरिकांनी गणेश मूर्तींचे दान करण्याचे आवाहन केले. हेस्कॉमच्या अभियंते अक्षय चौगुले यांनी, सुरक्षेसाठी सर्वच मंडळांनी हेस्कॉमची परवानगी घेऊनच वीज जोडण्या कराव्यात. उत्सवात अप्रिय घटना टाळण्यासाठी सर्वांनी विजयी पासून सावधानता बाळगण्याचे आवाहन केले.
यावेळी उपनिरीक्षक शिवराज नायकवडी, उमादेवी, मनीषा मग विभागाचे अकबर मुल्ला यांनी मनोगत व्यक्त केले. माजी नगरसेवक नंदकुमार कांबळे, विश्वास आबणे, अक्षय खोत विशाल गवंडी, सागर खोत यांनी सर्व मंडळ नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करणार आहेत. त्यासाठी डॉल्बीला परवानगी देण्याची मागणी केली. यावेळी निपाणीसह परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta