Wednesday , December 10 2025
Breaking News

आजाराला कंटाळून निपाणीत अज्ञाताने टेंम्पोमध्येच जीवन संपवले

Spread the love

 

निपाणी : कंबर व गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळून 60 वर्षीय अज्ञात इसमाने टेम्पोमध्ये जीवन संपवल्‍याची घटना आज (शुक्रवार) निपाणीत उघडकीस आली. विशेष म्हणजे जीवन संपवलेल्‍या व्यक्तीने आपल्या खिशातील पाकीटमध्ये मराठीत तशा प्रकारची चिठ्ठी कागदावर लिहिल्याची पोलिसांना मिळुन आली. सदर मृत व्यक्ती ही महाराष्ट्रातील असावी असा प्राथमिक अंदाज शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, शहराबाहेरील खरी कॉर्नर येथे मुन्नाफ पठाण यांचे चारचाकी वाहन रिपेरीचे गॅरेज आहे. गुरुवारी रात्री एका वाहनधारकाने आपले वाहन रिपेअरीसाठी त्यांच्या गॅरेजमध्ये लावले होते. दरम्यान पठाण हे सकाळी नेहमीप्रमाणे आपले गॅरेज उघडण्यासाठी आले असता, रिपेअरीसाठी उभ्या करण्यात आलेल्या टेम्पोच्या मागील बाजुच्या हौद्यामध्ये पठाण यांना जीवन संपवलेला व्यक्‍तीचा मृतदेह दिसून आला.

त्यानुसार पठाण यांनी याची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानुसार घटनास्थळी सीपीआय बी.एस. तळवार उपनिरीक्षिका उमादेवी यांच्यासह हवालदार पी.एम. घस्ती यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मृत व्यक्तीच्या खिशातील पाकीटमध्ये मराठीत मला गुडघे व कंबरदुखीचा त्रास असून, त्याला कंटाळून मी स्वतः आत्महत्या करीत आहे तसे चिठ्ठीत लिहिल्याचे दिसून आले. त्यानुसार शहर पोलिसांनी सदर व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत ओळख पटविण्याचे काम चालवले आहे. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षिका उमादेवी या करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांनी न्याय, हक्कासाठी अधिवेशनातील मोर्चात सहभागी व्हावे

Spread the love  राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *