
सय्यद निजामुद्दीन बुखारी; निपाणीत ईद ए- मिलाद
निपाणी (वार्ता) : कोणतेही काम करताना चांगले भावना ठेवून केल्यास त्याचे चांगले फळ मिळते. धर्म हा माणसापेक्षा मोठा असून प्रत्येकाने माणुसकी जपली पाहिजे. इस्लाम हा आदर्श जीवन मार्गाचा संदेश देणारा असून त्याचे आचरण सर्वांनी करावे, असे आवाहन सय्यद निजामुद्दीन बुखारी यांनी केले. शहर मिलाद कमिटी, मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद ए- मिलाद पैगंबर जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
सकाळी दर्गाह मध्ये चादर चढविण्यात आली. ९ वाजता मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत दर्गाह गल्ली, थळोबा पेठ, पाटणकर गल्ली, नेहरू चौक, जुना मोटार स्टॅण्ड, पी.बी. रोड, बेळगाव नाका, पोलिस स्थानका समोरून जामदार प्लॉट येथून शोभायात्रा काढून दर्गाह मंडप येथे समारोप करण्यात आला. त्यामध्ये मक्का, मदिना प्रतिकृती आकर्षणाचे केंद्र ठरली होती. विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते शीतपेयांचे वितरण आणि शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी मानवता, विश्वबंधुत्व आणि सर्वत्र सुख, शांती समृद्धी नांदावी याकरिता विशेष प्रार्थना करण्यात आली. लहान मुलांच्या विविध धार्मिक कला, गुण दर्शनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यासह मान्यवरांचा सत्कार
झाला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले.
कार्यक्रमास हाफिज अबरार पठाण, दादा देसाई, राज पठाण, शेरगुलखान पठाण, बख्तियार कोल्हापूरे, इम्तियाज मोकाशी, इरफान महात, मैनुद्दीन मुल्ला, पप्पू मोतीवाला, राजू मुल्ला, इलियास पटवेगार, शेरू बडेघर, दस्तगीर कमते, जॉन जमादार, सुबहान शेख, फारुक गवंडी, आरीफ मकानदार, इम्रान बडेघर, तौसिफ चाऊस, तौसिफ कोल्हापूरे, नसरो मकानदार, फय्याज मकानदार, बबलू सनदी, जावेद कर्नाजी, जावेद मुल्ला, शकील मुजावर, मोदीन मुजावर, वासीम देसाई, अकील पटेल, समीर मुल्ला, एजाज काझी, मुजीब पठाण, समीर शेखबडे, मय्याज गवंडी, बशीर हलगले, ईर्षाद काझी यांच्यासह सल्तनत ग्रुप, तहरिके मिलादुन हुसेन, सहारा स्पोर्ट्स क्लब, सेव्हन स्टार ग्रुप यांच्यासह मिलादुन कमिटी सदस्य,
बेपारी ग्रुप, माशाअल्लाह ग्रुप, एफआरजी ग्रुप, एहले सुन्नत जमातचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta