
निपाणी (वार्ता) : शेतातील विहिरी जवळ असलेल्या विद्युत मोटर पेटीमध्ये कनेक्शन देण्याचे काम करत असताना विजेचा धक्का बसून वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.३) पट्टणकुडी येथे घडली. उमेश श्रीकांत पाटील (वय ४०, मुळगाव बेनाडी सध्या रा. सुतार गल्ली, पट्टणकडी) असे मृताचे आहे.
उमेश पाटील हे वायरमन म्हणून बऱ्याच वर्षापासून काम करत होते. मंगळवारी दुपारी हालसिद्धनाथ मंदिर परिसरात असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरी जवळ असलेल्या विद्युत मोटरपेटी मध्ये विद्युत कनेक्शन देण्याचे काम करत होते. त्यावेळी अचानक विद्युत प्रवाह होऊन त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला.
दरम्यान त्यांना उपचारासाठी निपाणी येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या घटनेची नोंद खडकलाट पोलीस स्थानकात झाली आहे. उपनिरीक्षक अनिता राठोड यांनी पुढील तपास चालविला आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta